Nimrat Kaur on Linkup Rumours with Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे दुरावा आला यावर नेटकरी किंवा चाहते वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत आहेत. त्यात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा येऊ लागल्या तर सगळ्यांना आश्चर्य झालं. त्यांचा घटस्फोट होण्याचं कारण अभिनेत्री निम्रत कौरसोबत अभिषेकची वाढती जवळीकता असल्याचे म्हटले जाऊ लागले. दरम्यान, निम्रत किंवा अभिषेक यांच्यापैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे चाहत्यांना आश्चर्य झालं की नेमकं काय घडलं. या सगळ्यात निम्रतनं या चर्चांवर मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिटाडेल हनी बनी' या सीरिजच्या स्क्रिनिंग दरम्यान, निम्रत कौर तिच्याविषयी सुरु असलेल्या या चर्चांवर पहिल्यांदा बोलली आहे. तिनं यावेळी अभिषेकसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांवर ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. निम्रतनं ही मुलाखत झूमला दिली आहे. यावेळी पत्रकारानं सिंगलडमवर चर्चा केली आणि त्याच्या वक्तव्यावर निम्रतनं मान हलवत होकारार्थी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, हा व्हिडीओ एडिटेड होता. त्यानंतर निम्रत सिंगल असणाऱ्या महिलांना एकटं कसं फिरायचं याच्या काही टिप्स देत होती. 


दरम्यान, या आधी एका वक्तव्याची सगळीकडे चर्चा होती आणि ते वक्तव्य म्हणजे मी काहीही केलं तरी लोक तेच बोलणार जे त्यांना बोलायचं आहे. अशा प्रकारच्या अफवा थांबवणं शक्य नसतं आणि त्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते. तर निम्रतच्या टीमनं India.com शी संपर्क साधत या गोष्टीचा खुलासा केला की तिनं कधीच असं वक्तव्य केलेलं नाही. 


हेही वाचा : घरभाड्यासाठीही नव्हते पैसे आज 2700 कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री


दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्री आणि टॉक शो सुत्रसंचालक सिमी गरेवाल यांनी काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबाला पाठिंबा दिला मात्र, काही काळात त्यांनी ती पोस्ट डिलीट केली होती. एका नेटकऱ्यानं अमिताभ बच्चननं ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देत निम्रतनं सांगितलं की तुम्हाला काहीच माहित नाही. हे सगळं बंद करा. त्यावरून अनेकांनी त्यांना ट्रोल केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट करुन टाकली. तरी सुद्धा त्यांची पोस्ट ही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.