VIDEO: `व्यर्थ नहीं जायेगा जवानों का बलिदान` निरहुआचे गाणे शहीद जवानांना समर्पित
पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निरहुआने हे गाणे शहीद जवानांना समर्पित केले आहे. यू ट्यूबवर प्रदर्शित केलेल्या या गाण्याला नेयकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
मुंबई : भोजपुरी सिनेमाचा प्रसिद्ध गायक दिनेश लाल यादव उर्फ निरहुआने एक रॅप सोशल मीडियवर पोस्ट केले. पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निरहुआने हे गाणे शहीद जवानांना समर्पित केले आहे. यू ट्यूबवर प्रदर्शित केलेल्या या गाण्याला नेयकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता पर्यंत या गाण्याला 6 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिले आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण देशात हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. बॉलिवूडसोबतच साउथ आणि भोजपुरी सिनेमांनी हल्ल्याविरोधात आपला आवाज बुलंद केला आहे.
या गाण्यामध्ये निरहुआचा पाकिस्तानविरोधी राग व्यक्त होताना दिसत असून पुलवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ला माफीच्या लायक नसल्याचे त्याने म्हंटले आहे. 'व्यर्थ नहीं जाएगा जवानों का बलिदान' हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. निरहुआ याआधी 'बिग बॉस 6' शोमध्ये झळकला होता. निरहुआ भोजपुरी सिनेमातला गायक, अभिनेता, सूत्रसंचालक त्याच प्रमाणे निर्माता सुद्धा आहे.