मुंबई : सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील लगीनघाई सुरू आहे. कुठे मीडियापासून लपून तर काही ठिकाणी अगदी घरगुती स्वरूपात लग्नसोहळा पार पडत आहे. 


11 डिसेंबर ही तारीख आणि सेलिब्रेशनचा सोहळा अगदीच  खास होता. काल सकाळी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला त्या पाठोपाठ संध्याकाळी सात वाजता इटलीमध्ये 'विरूष्का'चं लग्न झाल्याची बातमी आली. कालच अभिनेत्री निर्मिती सावंतदेखील सासूबाई झाल्या.  



अभिनय सावंत अडकला लग्नबंधनात  


कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि पूर्वा पंडित यांचा काल विवाहसोहळा पार पडला. पूर्वा आणि अभिनय गेली बारा वर्ष एकत्र होते.  अखेर  सोमवारी हे दोघेही लग्नबंधनात अडकले.  


शाही विवाह सोहळा 


निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय देखील मराठी सिनेसृष्टीमध्ये आहे. ' श्रीमंत दामोदर पंत ' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीमध्ये आलेला अभिनय कालांतराने ' नकटीच्या लग्नाला..' या झी मराठीच्या मालिकेतूनही रसिकांच्या भेटीला आला होता.  



 


'पैठणी'त रंगले वर्‍हाडी 


अभिनयच्या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये रेणुका शहाणे, सोनाली कुळकर्णी, चिन्मयी सुमित, शुभांगी गोखले, प्राजक्ता माळी अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेकींनी वरमाई निर्मिती सावंत यांच्यासह अनेकींनी पैठणी साडी नेसली होती.