`सासू`बाई जोरात! Nita Ambani यांच्या फ्लोरल गाऊननं वेधलं सगळ्यांचे लक्ष, किंमत वाचून झोपच उडेल...
Nita Ambani Floral Gown Price: नीता अंबानी या कायमच आपल्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कपड्यांची (Nita Ambani Latest Floral Gown Price) किंमतही अवाढव्य असते. त्यामुळे त्यांच्या कपड्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा होताना दिसते. सध्या त्यांच्या लेटेस्ट लुकनं (Nita Amabani Clothing Cost) सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Nita Ambani Floral Gown: अतिश्रीमंत मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांच्या ड्रेसच्याही अनेकदा चर्चा होताना दिसतात. या त्यांच्या फॅशनेबल कपड्यांची किंमत काही सामान्य नसतेच. सर्वसामान्यांच्याही अवाक्याच्या बाहेरचे हे कपडे त्यामुळे अनेक अंबानी कुटुंबीय हे आपल्या अतिमहागड्या कपड्यांसाठी ट्रोलही होते. त्याचबरोबरीनं त्यांच्या सुंदर लुकचं कौतुकही केलं जातं. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये नुकतेच 'द साऊंड ऑफ म्यूझिक'चं (The Sound of Music) आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नीता अंबानींसह त्यांच्या सुनबाई राधिका मर्चंट यांनीही हजेरी लावली होती. परंतु सुनबाईंच्या लुकपेक्षा सासूबाईंच्या सुंदर लुकनं उपस्थितांचे लक्ष वेधले होतंं. हा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडला. यावेळी नीता अंबानी यांनी संपुर्ण कुटुंबासमवेत या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असणारा गाऊट परिधान केला होता. या गाऊनला गळ्याभोवती काळ्या रंगाचा टाय होता. त्यातून त्यांनी डायमंडचे गोलाकार आकाराचे कानातले परिधान केले होते. यावेळी त्यांच्या हाताची फॅशन ही बलून टॉपप्रमाणे होती. त्यांनी हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते. (nita amabni floral gown costs for rupees 5 lakhs photos goes viral on internet the sound of music nmacc)
बापरे, एका गाऊनची किंमत एवढी?
हा गाऊन गुची या जगप्रसिद्ध ब्रॅण्डचा आहे. या लुकमध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या सोबतच त्यांचा हा लुकही अत्यंत साधा आणि सिंपल होता. परंतु त्यांच्या या साध्या लुकवर जाऊ नका. या गाऊनची किंमत तुम्ही ऐकलीत तर तुमची झोपच उडेल! या लॉन्ग गाऊनची किंमत ही 6,800 डॉलर म्हणजे 5 लाख रूपये इतकी होती. या पैशांत कदाचित आपण एक घर भाड्यानं घेऊ. त्यांचा हा गाऊन सिल्कच्या फॅबरिकचा होता. त्यांनी डायमंडच्या कानातल्यांबरोबरच डायमंड रिंगही घातली होती. त्यांचे हे फोटो एक रात्रीत सगळीकडेच व्हायरल झाले आहेत. त्यातून त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या या लुकचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा - The Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच...
सुनबाईपेक्षा सासूबाई भारी!
सध्या नीता अंबानींचा हा लुक सगळीकडे व्हायरल झाला आहे. तेव्हा राधिका मर्चंटच्या लुकशी अनेक नेटकरी तुलना करताना दिसत आहे. सोबतच राधिकाचा ब्लॅक फ्लोअर गाऊनकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते आहे. आणि सासूबाई नीता अंबानींच्या लुकवर चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत.