मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे छंद खूप हटके आणि तितकेच महागडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता अंबानी यांचे ड्रेस असो की पर्स, चहाचा कप असो किंवा जेवणाचे ताट, प्रत्येक गोष्ट इतकी महाग असते की सामान्य माणूस आयुष्यभर कमावू शकत नाही.


नीता अंबानींचा आणखी एक छंद इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. चर्चा आहे की भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी नीता अंबानी दोन लाख नव्हे तर 315 कोटी रुपयांचा मोबाईल वापरतात.


ज्यामध्ये मौल्यवान हिरे जडलेले आहेत आणि मोबाईल प्लॅटिनम आणि सोन्याचा बनलेला आहे.


इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लोक लिहित आहेत की हा नीता अंबानींचा मोबाईल आहे जो आयफोन कंपनीचा आहे आणि त्यात 6 गुलाबी हिरे जडले आहेत.


मोबाईलवर सोन्याचा मुलामा आहे, ज्याची किंमत $48.5 मिलियन म्हणजेच 315 कोटी रुपये आहे आणि iPhone एवढे महागडे मोबाईल फक्त श्रीमंत लोकांसाठी बनवतो.


अखेर रिलायन्सच्या जीएमने दिलं उत्तर


सोशल मीडियावर लोकांनी नीता अंबानींच्या मोबाईलबद्दल इतकी अफवा पसरवली की रिलायन्स जिओचे जीएम अनुज शर्मा यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.


त्यांनी सांगितले की ज्या फोनचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि नीता अंबानींचा मोबाईल असल्याचे सांगितले जात आहे, ती फक्त खोटी अफवा आहे. नीता अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब फक्त ब्लॅकबेरी मोबाईल वापरतात.