मुंबई : मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री निती टेलर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नाचा माहोल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निती विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू नितीने तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन बाळगले होते. अखेर तिनी आपण लग्न करणार असल्याची कबुली दिली आहे. ती लवकरच साखरपुडा करणार आहे. चंदेरी जगाबाहेरील एका व्यक्तीला ती गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एका बॅचलर पार्टीच्या व्हिडिओने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा अंदाज तिच्या चाहत्यांकडून वर्तवला जात होता. नितीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आपण लवकरच साखरपुडा करणार असल्याचे नितीने स्पष्ट केले आहे. 


'हे क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आहे. मी खुप आनंदात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्याकडून मला प्रचंड प्रेम मिळालं आहे. माझ्या आयुष्यातील महत्वाची बातमी तुमच्यासह शेअर करत आहे. मी लवरच साखरपुडा करणार आहे.' असे नितीने म्हटले आहे. परीक्षीत बावा नावाच्या मुलासोबत निती साखरपुडा करणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.