Manasi Desai On Nitin Desai Death: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येनंतर आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नितीन देसाई यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असताना आता नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाईने (Nitin Desai's daughter) भावनिक आवाहन केलं आहे. एएनआयला प्रतिक्रिया देताना मानसी देसाई भावूक झाल्याचं दिसून आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स (ECL finanace) कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा झालाय. खालापूर पोलीस ठाण्यात कलम 306 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झालीये, अशातच आता माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.


नेमकं काय म्हणाली मानसी देसाई?


माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता, असं मानसी देसाई म्हणते. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला, कर्ज फेडण्यासाठी दोन वर्ष त्यांनी कंपनीसोबत मिटिंग घेतल्या होत्या. लोन सेटलमेंट किंवा रीस्ट्रक्चर बाबत कंपनीने आश्वासन देखील दिलं होतं. इन्व्हेस्टर बाबांची मदत करायला तयार होते, मात्र त्यांनी त्यांना मदत करु दिली नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.


माझ्या बाबांनी खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे. त्यांनी खूप कष्टाने त्यांचं नाव कमवलंय, त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं मानसी नाईक म्हणते. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं. त्याचबरोबर त्यांच्या शेवटच्या इच्छानुसार, सरकारने या स्टुडियोचा ताबा घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.



दरम्यान, चित्रपटसृष्टीत नितीन देसाई उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही ओळखले जायचे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय.