दोन दिवसांपासून संगीतकार ए आर रहमान आणि त्याची सायरा बानो यांच्या घटस्फोटाची बातमी लक्षवेधून घेत आहे. 29 वर्षांचा संसार मोडत या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच एआर रहमानच्या टीममध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेली बेसिस्ट मोहिनी डे ने देखील पती मार्क हार्टसुचला घटस्फोट दिल्याच जाहीर केलं आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एआर रहमान आणि मोहिनी यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चेने यामधून जन्म घेतला आहे. या सगळ्यात एआर रहमानच्या वकिलाने सगळंच सांगून टाकलं आहे. 


सोशल मीडियावर काय चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सुरुवातीला एआर रहमान आणि सायना बानो यांचा एवढा वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? गेल्यावर्षी 2023 मध्ये सायरा बानोला मातृभाषा आणि तामिळ याच्यावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर एआर रहमानने सायनाची बाजू घेतली होती. पण मग एक वर्षात असं काय झालं? असा सवाल चाहते सोशल मीडियावर विचारत होते. 


(हे पण वाचा - AR Rahman Divorce : पालकांच्या घटस्फोटावर मुलांचं भावनिक आवाहन; व्यक्त होत म्हणाले...) 


मोहिनी डेने घेतला घटस्फोट 


पण त्याच दरम्यान ए आर रहमानच्या टीममधील मोहिनी डेने देखील घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली. यानंतर एकच चर्चा रंगली. मोहिनी आणि रहमान यांच्यात काही संबंध आहेत का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. या दोघांमध्ये काय कनेक्शन? असा देखील प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. एकाच दिवशी घटस्फोट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. हा योगायोग नसून यामध्ये काय संबंध आहे? असा सवाल चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत. 


( हे पण वाचा - 'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया) 


यावर वकीलाचं उत्तर 


या सगळ्या चर्चा होत असताना एआर रहमानच्या वकिल वंदना शाह यांनी घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, या दोन्ही घटस्फोटांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही. सायरा आणि रहमान यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे. या दोघांमध्ये भावनिक तणावातून घटस्फोट झाला आहे.