`लग्नाची काय गरज? मी तर...`, बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा
लग्ना आधिच आई झालेली माही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई : 'साहेब बिवी और गॅंगस्टर' आणि 'देव डी' या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री माही गिलच्या चर्चांना सध्या चांगलेच उधाण आले आहे. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून लांब असलेल्या माहीने खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. लग्ना आधिच आई झालेली माही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिला तीन वर्षांची मुलगी देखील आहे.
लग्ना आधिच माही एका मुलीची आई झाली. तिच्या मुलीचे नाव वेरोनिका असं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ती तीन वर्षांची होईल. नुकाताच झालेल्या एका मुलाखतीत तिने अद्याप लग्न न केल्याचा खुलासा केला आहे.
माही म्हणाली की, 'मला गर्व आहे, की मी एका मुलीची आई आहे. मी लग्न बंधनात अडकली नसली तरी, माझ्या मनात येईल तेव्हा मी लग्नासाठी तयार होईल. ऑगस्ट महिन्यात माझी मुलगी तीन वर्षांची होईल.' माहीने 'दबंग', 'जंजीर', 'पान सिंग तोमर' या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटवली आहे.
आपल्या खाजगी आयुष्यावर संवाद साधताना ती म्हणाली की, 'मी माझ्या खजगी आयुष्याबद्दल कोणत्याच गोष्टी सहसा शेअर करत नाही, म्हणून माझ्या मुलीबद्दल कोणालाच माहित नाही. मी माझ्या मुलीला नेहमी मीडियापासून लांब ठेवते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील तिचे फोटो नाहीत. '
त्यानंतर माहीला लग्न कधी करशील असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, लग्नाची गरज काय? असे उत्तर तिने दिले. ४३ वर्षीय माही तिचा आगामी 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शीत होणार आहे.