मुंबई : आत्महत्या करुन आयुष्य़ संपवणाऱ्या अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास अद्यापही सुरुच आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉशचे अहवाल हाती आले आहेत. ज्यामध्ये कोणताही प्रकारचा 'फाऊल प्ले' नसल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलिना फॉरेन्सिक लॅबकडून हा अहवाल दिल्याचं कळत आहे. जो सर्वोच्च न्यायालात इतर अहवाल आणि कागदपत्रांशी जोडण्यात आला आहे. यातील स्टमक वॉश रिपोर्टमधून हे स्पष्ट झालं आहे की, सुशांतवर विषप्रयोग करण्यात आलेला नव्हता. त्यानंही अशा कोणत्याही पदार्थाचं सेवन केलं नव्हतं.


नेल सॅम्पलिंगच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या वेळी कोणत्याही प्रकारची बळजबरी झाली नव्हती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या तोंडातून जो फेस आला होता, तो कपड्यांवर पडून सुकल्यामुळं सफेद रंगाच्या डागाप्रमाणे दिसत होता. या रिपोर्टनुसार सजदर प्रकरणार कोणत्याही प्रकारची झटापट किंवा मारामारी झालेली नाही. 



सुशांतनं १४ जूनला वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्हत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येमुळं साऱ्या कलाविश्वालाच हादरा बसला होता. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या कलाकारानं नैराश्यामुळं आत्महत्या केल्याची बाबही समोर आली. पण, अनेक प्रश्न अनुत्तरित असल्यामुळं आता त्याच्या या प्रकरणीचा तपास सीबीआयच्या हाती देण्यात आला आहे. ज्यामुळं सुशांतसोबत काही काळासाठी लिव्ह इनमध्ये राहणारी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.