दिल्लीतील नोएडा येथील सुपरटेक ट्विन टॉवर्स (twin towers demolition) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. 28 ऑगस्ट रोजी दोन्ही इमारती पाडण्यात आल्या. या इमारती पाडल्यानंतर त्या चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंडली भाग्य (kundali bhagya) फेम अभिनेता मनित जौरा (actor manit joura) याचेही या गगनचुंबी इमारतींच्या पडझडीत नुकसान झाले आहे. मनित जौराने त्याची मालमत्ता गमावली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनितने या इमारतीत पैसे गुंतवल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकांसोबतचा त्याचा अनुभव दुःस्वप्न असल्याचेही मनितने सांगितले.


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनित जौराने सांगितले की, त्याच्या वडिलांनी 2011 मध्ये ट्विन टॉवर्समध्ये 2 फ्लॅट खरेदी केले होते आणि त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी पैसे गुंतवण्याच्या उद्देशाने दुसरा फ्लॅट घेतला. बांधकाम व्यावसायिकांनी त्याला इमारतींच्या बांधकामासंबंधीच्या अडचणी सांगितल्या नाहीत आणि त्याने 8 वर्षांपूर्वी कंपनीवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला.


टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुखातीमध्ये मनितने सांगितले की, "माझ्या वडिलांना अनेक वेळ कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि मला खूप वाईट वाटायचे की त्यांना या वयात हे सर्व सहन करावं लागतंय. माझ्या वडिलांनी या ठिकाणी सुंदर जागेचे स्वप्न पाहिले होते, जे पूर्ण होऊ शकले नाही. बिल्डरांनी घराची किंमत म्हणून घेतलेल्या पैशावर खरेदीदारांना व्याज द्यावे लागेल," असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.


व्याज न मिळाल्याने ठोकला दावा


“त्यांनी आम्हाला काही महिन्यांसाठी व्याज दिले असले तरी आम्ही आणखी एक दावा दाखल केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला छोट्या हप्त्यांमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली ज्यामुळे फारसा फरक पडला नाही. कारण आम्ही मालमत्तेसाठी दिलेली रक्कम खूप मोठी होती. मनिया प्रकरणात बराच वाद झाला आहे. माझ्या कुटुंबासाठी हे एक दुःस्वप्न आहे," असे मनितने सांगितले.