मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या नृत्य अदांना तरूणांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण यावेळेस नोरा तिच्या चाहत्यांसाठी खास नृत्य नजराना घेऊन आली आहे. तिने तिच्या स्वत:च्या गाण्याचे अरेबिक व्हर्जन तयार केले आहे. 'दिलभर' गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर नोरा थिरकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरेबिक व्हर्जन व्हिडीओ तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिच्या या अदांनी तरूणांना घायाळ केले आहे. व्हिडीओ शेअर केल्या नंतर हा व्हिडीओ २ लाख ३८ हजार चाहत्यांनी पाहिला आहे. 


नोरा फतेही लवकरच अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफसह झळकणार आहे. हे त्रिकूट 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेता वरूण धवण आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरसह सुद्धा नोरा रूपेरी पडद्यावर आपली भूमिका साकारताना दिसणार आहे. 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात नोरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.