मुंबई : नोरा फतेही अशी एक डान्सर आणि गायिका आहे जिने खूप कमी वेळात लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या डान्स आणि हटके स्टाईलमुळे तरुणांना तिचं अक्षरश: वेड लागलं आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. सोशल मीडियावर नोरा फतेहीची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. या क्षणी, नोराच्या या दिवसांच्या डान्स व्हिडिओंसोबत तिच्या फ्लर्टिव्ह स्टाईलचे व्हिडिओही चाहत्यांना वेड लावत आहेत. अलीकडेच नोरा आणि आदित्य नारायणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. हा व्हिडिओ पुन्हा सोशल मिडिआवर व्हायरल होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ एका जुन्या रिअ‍ॅलिटी शो दरम्यानचा आहे. आदित्य नारायण लग्नासाठी नोरा फतेहीला प्रपोज करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. हे ऐकून नोरा फतेहीला धक्का बसला. ती म्हणते की "आधी तुमचं बिघडलेलं करिअर बनवा, इंडस्ट्रीत आपलं नाव बनवा." हा गमतीशीर व्हिडिओ जो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात असून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.


नुकतच आदित्य नारायणचं लग्न झालं. ज्यानंतर त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. जर आपण नोराबद्दल बोललो तर ती लवकरच अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात दिसणार आहे. चाहत्यांना आशा आहे की या चित्रपटात नोराचा धमाकेदार डान्स पहायला मिळेल.