मुंबई : डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेहीचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही धमाल करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.  
 
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये नोरा फतेही तिच्या फोनमध्ये व्यस्त आहे. तर ती कधी तिच्या केसांनी खेळतेय, तर कधी गाण्यावर कंबर हलवताना दिसत आहे. या व्हि़डीओतला तिचा अॅटीट्युड चाहत्यांना आवडला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा आहे लुक?
 चित्ता प्रिंट स्ट्रॅपी टॉप आणि डेनिम जीन्समध्ये नोरा अप्रतिम दिसत आहे. तसेच नोराने हाय हिल्स आणि पिवळ्या रंगाच्या पर्सने तिचा लूक पूर्ण केला. यासह, अभिनेत्रीने कमीतकमी मेकअप केला आहे. नोरा सध्या अबुधाबीमध्ये आहे, जिथून तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)


दरम्यान सध्या नोराच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडिओला तुफान कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.