पाकिस्तानी गाण्याच्या रिमेकवर थिरकली नोरा फतेही, व्हिडिओ होतोय व्हायरल
यूट्यूबवरही या गाण्याला काही तासांत लाखो लोकांनी पाहिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचं नवं गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं पाकिस्तानी गाण्याचा रिमेक असल्याचं समजतंय. झालिमा कोका कोला असं या गाण्याचं नाव आहे. इंटरनेटवर हे गाणं सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान हे गाणे ट्विटरपासून ते फेसबुकपर्यंत सगळीकडेच ट्रेंड होत आहे. यूट्यूबवरही या गाण्याला काही तासांत लाखो लोकांनी पाहिलं आहे. नोराच्या प्रत्येक अल्बम साँगची चांगलीच चर्चा रंगते. त्यात तिचा बोल्ड अंदाज सगळ्याचंच लक्षवेधून घेणारा असतो. पण नोराचं हे नवं गाणं पाकिस्तानी सिनेमातील गाण्याचा रिमेक आहे.
पाकिस्तानी सिनेमातील गाण्याचा रिमेक
खरंतर, हे गाणं एक लोकगीत आहे. जे 1986 मध्ये रिलीज झालेल्या पाकिस्तानी चित्रपटासाठी पुन्हा तयार केले गेलं होते. 'चैन टू सूरमा' या पाकिस्तानी सिनेमासाठी ज्येष्ठ पाकिस्तानी गायक नूर जहां यांनी हे गाणे गायले होतं. हे गाणे त्या काळातील सुपरहिट गाणं ठरलं होतं.