मुंबई : मॉडेल, डान्सर, गायक आणि अभिनेत्री म्हणून नोरा फतेही आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. फक्त भरतातचं नाही तर जगभरात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी संख्या आहे. नोराला लोकप्रियता मिळाली ती म्हणजे 'बिग बॉस'च्या माध्यमातून. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. नोरा फक्त तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नाही तर भन्नाट डान्समुळे चर्चेत असेत. एवढंच नाही तर नोरा फिटनेसकडे देखीव तितकचं लक्ष देते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिट राहण्यासाठी नोरा नक्की करते तरी काय असा प्रश्न प्रत्येक मुलीला पडत असेल. पिझ्झा-बर्गर खाऊन देखील नोरा कायम फिट राहते. आज आपण नोराच्या फिटनेस बद्दल जाणून घेवू. 



महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्य अभिनेत्रींप्रमाणे नोरा रोज जीममध्ये जात नाही. तर ती घरीचं वर्कआऊट करते. कधीतरी ती जीममध्ये जाते. नोराला पिलेट्स करायला प्रचंड आवडत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती पिलेट्स करते. 


पिलेट्स  करण्याचे फायदे
- तणाव कमी होतो. 
- मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होतात. 
- शरीर लवचीक राहातं. 


पिलेट्स शिवाय  नोरा फिटनेसचं रहस्य आहे ते म्हणजे डान्स. नोरा जीमला जाण्या ऐवजी रोज डान्स क्लासला जाते. रिकाम्या वेळेत देखील ती डान्स करत असते. 


फिटनेसबद्दल नोरा म्हणते, 'जेव्हा मला संधी मिळते, मी डान्स करते. माझं वर्कआऊट आणि एक्सरसाईजचा फॉर्म डान्स आहे...'