मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सौदर्य आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. नोराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या अदांनी सर्वांना वेडं केलं आहे. बॉलिवूडमधील काही लोकांनी तर हे मान्य देखील केलं आहे की, तिच्या इतकं सुंदर डान्स बॉलिवूडमध्ये कोणीही करत नाही. नोरा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असते. ती नेहमीच आपले फोटो किंवा व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नोराचे चाहते देखील नोराला पाहण्यासाठी आवर्जून सोशल मीडियावर येतात. नोराचे फोटो पाहण्यासाठी चाहते इतके आतुर झाले आहेत की, सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करताच ते व्हायरल होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नोरा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मुळात ही बातमी स्वत: नोराने सोशल मीडियावर दिली असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.


नोरा फतेहीला वयाच्या २८ व्या वर्षी लग्न करणार आहे आणि तिला तिचा जीवनसाथी अखेर सापडाल आहे, ज्याच्यासोबत ती संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी तयार आहे.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नोराचा हा नवरदेव तिच्यापासून वयाने खूपच लहान आहे.


नोराने स्वत: आपल्या होणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हणाली, "मला माझा वर सापडला आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे."


ही बातमी ऐकून तिच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे.



वास्तविक, एका मुलाने रील व्हिडीओ बनवला होता आणि सांगितले होते की, त्याला दिलबर वाली नोरा फतेहीशी लग्न करायचे आहे. त्यानंतर नोराने तिच्या इंस्टाग्रामवर हा रील पोस्ट केला आणि ती या लहान मुलाशी लग्न करणार आहे, असं गंमतीने सर्वांना सांगितलं.


असं असलं तरी सध्या लग्न करण्याचा नोराचा कोणताही हेतु नाही. तिचं संपूर्ण लक्ष तिच्या करिअरवर आहे.