मुंबईः नोरा फतेहीने नुकतेच पुन्हा एकदा तिच्या किलर स्टाईलने सर्वांना वेड लावलंय. 'डान्स दिवाने'च्या स्टेजवर नोराने इतका छान डान्स केला की, रणवीर सिंगचेही भान सुटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेही एक अप्रतिम डान्सर असून या बड्या अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या आहेत. अलीकडेच 'डान्स दिवाने'च्या मंचावर नोराने तिच्या किलर मूव्ह्सने सर्वांना भान विसरायला लावलं. नोराने स्वतःच्या 'गरमी' गाण्यावर डान्स केला असून या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या आगामी सिनेमा जयेशभाई जोरदारच्या प्रमोशनसाठी नुकतंच 'डान्स दिवाने'च्या स्टेजवर हजेरी लावली. यावेळी नोरा फतेहीसोबत डान्स करण्याचा मोह त्याला 
आवरता आला नाही.


रणवीर सिंग नोरा फतेहीच्या कुसू कुसू गाण्यावर डान्स करताना कंबर हलवताना दिसत आहे. रणवीरला कंबर हलवताना पाहून सोबत उभी असलेली नोरा फतेही सुद्धा हैराण झाली आणि सर्व जजही टाळ्या वाजवू लागले.


रणवीर सिंग आणि नोरा फतेहीच्या डान्सचा हा व्हिडिओ नोरा फतेही लव्ह फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रणवीर आणि नोरा यांनी धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही चाहते रणवीर सिंगच्या डान्स मूव्हचे कौतुक करत आहेत.