मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच नोरानं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोरानं काळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. व्हिडीओत नोरा पोज देताना दिसते. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फक्त नोराचा व्हिडीओ नाही तर नोरानं दिलेल्या कॅप्शनेही सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नोराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिच्या टॅलेन्ट आणि मेहनतीमुळे तिनं चित्रपटसृष्टीत उच्च स्थान मिळवलं आहे. नोरा फक्त एक जबरदस्त डान्सर नाही तर तिनं स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणूनही सिद्ध केले आहे. आज त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. जगभरात तिचे चाहते आहेत. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.


नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती काही काळ अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली. दरम्यान, अशीही चर्चा आहे की लवकरच नोरा 'झलक दिखला जा 10' मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.  नोराच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.