बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीचा डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ
सोशल मीडिया सेन्सेशन नोरा फतेही इंस्टाग्रामवर खूप सक्रिय दिसत आहे.
मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन नोरा फतेही इंस्टाग्रामवर खूप सक्रिय दिसत आहे. नोराने तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या चाहत्यांनाही नोराची प्रत्येक पोस्ट पाहायला आवडते. याच क्रमात नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. नोरा फतेही या व्हिडिओमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत मस्त स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.
नोरा फतेहीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती पिंक कलरच्या शॉर्ट्समध्ये व्हाइट स्नीकर्स घालून अतिशय सुंदर स्टाइलमध्ये डान्स करत आहे. नोराच्या या पोस्टला खूप कमी वेळातच 6 लाख 94 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फॅन्ससोबतच सेलेब्सही नोराच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. राखी सावंतनेही नोराच्या व्हिडिओवर फायर इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. नोराने व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे की, 'खूप मज्जा आली. हा ट्रेंड आम्ही एकत्र केला याचा मला खूप आनंद आहे.
व्हिडिओवर कमेंट करत, एका सोशल मीडिया युजर्सने लिहिलं की, 'मला आग बुजवणारा हवा आहे'. तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, 'East or West Nora is the best'. विशेष म्हणजे नोरा फतेही ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर्सपैकी एक आहे. नोराने आपलं नृत्यकौशल्य अनेक चित्रपटांमध्ये पसरवलं आहे. नुकताच ती भुज या चित्रपटातही अभिनय करताना दिसली होती.