मुंबई : प्रत्येकाला निर्दोष ग्लोईंग त्वचा आवडते. पण जेव्हा नोरा फतेहीसारख्या सेलिब्रिटीसारखी त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक महिलेला हे जाणून घ्यायला आवडेल की, नोरा 29व्या वर्षीही काय करते, ज्यामुळे तिची त्वचा खूपच ग्लोईंग, निर्दोष आणि वर्जिन आहे. वर्जिन स्किन हा शब्द त्या त्वचेसाठी वापरला जातो, जो मुलांच्या त्वचेसारखा निर्दोषपणा दर्शवितो. हॉट दिसणारी नोरा फतेहीच्या स्किनचं टेक्सचर अगदी लहान मुलासारखंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरी नोरा कॅनडाची आहे. पण भारतात काम करत असताना तिला इथल्या हवामानानुसार आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. यासाठी ती तिच्या मेकअप फॉर्ममध्ये एक खास कॉकटेल तयार करते. हे कॉकटेल ड्रिंक नसून हे कॉकटेल स्किनचं फाऊंडेशन आहे.


नुकतीच नोरा फतेही शिमरी पर्पल साडीमध्ये दिसली होती. या डिझायनर ड्रेप साडी ड्रेसमध्ये नोराचं सौंदर्य पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले. आम्ही तुम्हाला नोराचा हा लुक यासाठी दाखवत आहोत कारण जेव्हा-जेव्हा एखादी स्त्री आपल्या स्किन टोन लक्षात घेऊन ड्रेस निवडते तेव्हा तिचं रूप अनेक पटीने खूलुन दिसू लागतं.


आपल्याला सर्वांना नोराच्या क्लीन डांन्स मूव्स आवडतात. या मूव्हचे जितकं श्रेय नोराच्या अभ्यासाला जातं तितकंच श्रेय तिच्या चमकत्या त्वचेला जातं. कारण जेव्हा त्वचा स्वच्छ आणि चमकणारी असते, तेव्हा आपल्या संपूर्ण लुकला एक वेगळी समानता असते, ज्यामुळे आपण अधिक आकर्षक दिसतो.


आपली गॉर्जियस  आणि बेबी लाइक त्वचेचं सीक्रेट सांगताना नोरा म्हणाली की, माझ्या डांन्समुळेच माझी त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. तसंच, मी हायड्रेशनची पूर्ण काळजी घेते. यासाठी, पाण्याबरोबरच मी हर्बल ड्रिंक्स, नारळपाणी आणि ज्युस सारख्या निरोगी पातळ पदार्थांचा वापर करते.  बाकी माझं फिटनेस, स्किन, ग्लो आणि खुशी यासगळ्याचं श्रेय माझ्या डान्सला जातं!


नोराला मेकअप करायला आवडतो पण ती बहुतेक शुटिंगशिवाय आपली त्वचा स्वच्छ ठेवते.  जेणेकरून त्वचेला मुक्तपणे श्वास घेता येईल आणि हलकी राहू शकेल. मॉइश्चरायझर आणि टोनिंगशिवाय ती घरात जास्त वस्तूंचा ती वापर करत नाही.


नोरा म्हणाली की, भारताचं हवामान खूप गरम आहे आणि इथले हवामान बर्‍याच वेळा दमट असतं. तर माझ्या त्वचेला सर्व वेळी नितळ आणि लवचिक स्वरूप देण्यासाठी, मी फेस पाउडर लावते जे दिवसाच्या अनेक वेळा माझ्या त्वचेच्या टोनला पूरक असतं. मी शूटवर असतानाच हेच करते. या फेस पावडरला वेळोवेळी त्वचेवर डब केल्याने चेहरा ऑईली होत नाही आणि त्वचाही अधिक ताजी दिसते. वारंवार फेस पावडर लावल्यास मेकअप खराब होत नाही. तसंच, चेहरा बराच काळ चमकत राहतो.