Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या 'दिलबर' गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली आहे. तिच्या गाण्यामधील डान्स स्टेप्सने देखील सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. तिच्या या डान्सचे कलाकारांनी देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केलं. अभिनेत्री नोरा फतेहीने मोठ्या चित्रपटांमध्ये आयटम साँग करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता अभिनेत्री नोरा फतेहीने एका मुलाखतीत इंडस्ट्रीमधील अनेक गुपिते उघड केली आहेत. नोराने मेलबर्न 2024 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यासाठी तिला पैसे मिळाले नाहीत. ज्या गाण्यावर आज संपूर्ण बॉलिवूड नाचत आहे. या चित्रपटातील ते गाणे प्रचंड हिट झाले. आज देखील युट्यूबवर लाखो लोकांनी ते गाणं पाहिले आहे. 


नोरा फतेही सोडणार होती देश 


डान्सर नोरा फतेही नाव कमवण्यासाठी भारतात आली होती. ती जेव्हा आली तेव्हा तिच्याकडे जेवणासाठी देखील पैसे नव्हते. त्यावेळी नोरा फतेहीला 'दिलबर' आणि 'कमरिया' या गाण्यासाठी कॉल आला. तेव्हा तिने बॅग पॅक करून भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. 


नोराने फ्रीमध्ये केलं काम


नोरा फतेहीने सांगितले की, तिने सर्वात आधी 'कमरिया' चित्रपटासाठी शूटिंग केलं. त्यानंतर दोन आठवड्यांनी तिने 'दिलबर' गाण्यासाठी काम केलं. त्यावेळी नोरा फतेहीला पैशाची गरज होती. पण तिने त्यावेळी पैसे कमवण्यासाठी काम नाही केलं. त्यावेळी तिला स्वत: ला सिद्ध करायचे होते. 'दिलबर' गाण्यासाठी तिने स्वत: सर्व डान्सर्सना एक आठवडा प्रशिक्षण दिलं. जेणेकरून तिच्या आणि त्यांच्या सर्व स्टेप्स जुळतील.


'दिलबर' गाण्याचे शूटिंग करताना नोरा फतेहीला निर्मात्यांनी एक छोटा ब्लाउज दिला होता. त्यावर अभिनेत्री नोरा फतेहीने निर्मात्यांना नकार दिला होता. त्यावेळी नोराने निर्मात्यांना स्पष्ट सांगितले की ती हा ब्लाउज घालू शकत नाही. त्यावर नोरा म्हणाली की, मला माहिती आहे की तुम्हाला मला हॉट दाखवायचे आहे. हे गाणे देखील खूप सेक्सी आहे. पण मला ते अश्लील बनवायचे नाही. असं नोरा फतेही म्हणाली. त्यानंतर नोरा फेतहीसाठी नवीन ब्लाउज बनवला गेला.