Nora चं इंस्टाग्राम बंद होण्यामागील खरं कारण समोर, अभिनेत्रीनं दिली माहिती
या सगळ्या प्रकारानंतर नोरा अचानक कुठे झाली असा लोकांना आणि तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला.
मुंबई : काल संध्याकाळी नोरा फतेहीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये अभिमनेत्रीचे अकाउंट झाल्याचे सांगणात येत होते. काल अभिनेत्री दुबईला वेकेशनवरती गेली होती. त्यावेळी तिने सिंहा सोबत फोटो शेअर केला. त्यानंतर मात्र तिचं इंस्टाग्राम अकाउंट दिसणं बंद झालं होतं आणि तिचे जुने पोस्ट ओपन करण्याचा प्रयत्न केला, तर ते ओपन देखील होत नव्हतं.
या सगळ्या प्रकारानंतर नोरा अचानक कुठे झाली असा लोकांना आणि तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला. नारोचा अकाउंट तिनं स्वत: डिलीट केलं की, काही तक्रारींमुळे ते Deactivate झालं होतं हे काही कळायला मार्ग नव्हता.
अनेकांना वाटलं की, त्यांना आता नोराला पुन्हा पाहाता येणार नाही. परंतु आता नोरा पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरती सक्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर नोराचा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, जिथे ती अनेकदा तिचे फोटो-व्हिडीओ आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देतअसे, परंतु नोराचे इन्स्टाग्राम पेज शुक्रवारी सुमारे 4 तास बंद होते. परंतु याबद्दल नोराने कोणाला काहीच माहिती दिली नव्हती.
परंतु तिचं अकाउंट पुन्हा सुरू झालं आहे. खरंतर नोराचं अकाउंट बंद नाही, तर हॅक झालं होतं. या घटनेची माहिती स्वत: नोराने सांगितली.
या घटनेबद्दल सांगताना नोराने पोस्टमध्ये लिहिलं की, सकाळपासून काही हॅकर तिचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत होते. नोरा फतेहीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 37.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या नृत्य कौशल्याने लोकांना वेड लावणारी नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नोराचं अकाउंट सुमारे 4-5 तासांसाठी खाते निष्क्रिय झाले होते, मात्र, त्यानंतर आता खाते रिकव्हर झाले. नोराचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट झाल्यानंतर #NoraFatehi ट्विटरवर ट्रेंड करू लागले होते.