खुशी कपूर नव्हे, तर `या` अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL
AP Dhillon liplock : एपी ढिल्लोंन खूशी कपूर नाही तर या अभिनेत्रीला करतोय डेट.... व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा, तर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया एकदा पाहाच
AP Dhillon liplock : लोकप्रिय गायक एपी ढिल्लोंनचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. त्याची गाणी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच त्याचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. त्या गाण्याचं नाव विथ यू असं आहे. या गाण्यात एपी ढिल्लोंसोबत अभिनेत्री बनीता संधू दिसत आहे. त्या दोघांची गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, त्या दोघांचा आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत ते दोघे ही किस करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओन आता सगळ्यांचे लक्ष वेधलं असून त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
एपी ढिल्लोंन आणि बबीताचा हा व्हिडीओ बबीतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत बबीतानं ऑफ व्हाईच रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर एपीनं ऑफ व्हाईट रंगाचं फ्लोरल प्रिंटचं शर्ट परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत बबीतानं कॅप्शनमध्ये माईकचं इमोटिकॉन वापरलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी एपी ढिल्लोंन आणि खूशी कपूरच्या रिलेशनशिपची चांगलीच चर्चा रंगली होती. खूशी त्याच्या अनेक शोजला अनेक स्टारकिड्स प्रमाणे जाते हे पाहिल्यानंतर आणि त्या व्यक्तीरिक्त एपी ढिल्लोंनच्या गाण्यात खूशी कपूरचा उल्लेख पाहता सोशल मीडियावर या चर्चा सुरु झाल्या होत्या.
हेही वाचा : रजनीकांत यांच्या 'जेलर'नं बॉक्स ऑफिसवर 4 दिवसात केली 300 कोटींची कमाई!
एपी आणि बबीताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सगळ्यांचे लक्ष एपीच्या कमेंटनं वेधले आहे. एपीनं बबीतानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत चाकूचं इमोटिकॉन शेअर केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'म्हणजे खूशी कपूरचे मीम्स आणि सगळं काही खोटं होतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, जरं हे गाणं तुमच्या रिलेशनशिपसाठी असेल तर मी तुमच्यासोबत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गाण्यातील त्या दोघांची केमिस्ट्री मला प्रचंड आवडली.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अखेर आम्हाला हसते तेव्हा खूशी कपूर दिसतेस, या वाक्याचं उत्तर मिळालं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूशी कपूरचं काय झालं.' तर त्यावर कमेंट करत अनेकांनी तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहात का? असा सवाल केला आहे. एक नेटकरी म्हणाला, 'अखेर! एपी ढिल्लोंनची गर्लफ्रेंड हे कळलं.' तर अनेकांनी खूशी कपूरचं नावं घेत रडण्याचे इमोजी वापरलं आहे.