Bollywood Actress Rekha Controversies: जया बच्चन आणि रेखा आज कितीही चांगल्या मैत्रीणी असल्या तरीसुद्धा अमिताभ बच्चनसोबत गाजलेल्या रेखाच्या प्रेमप्रकरणामुळे दोघींमध्ये एकप्रकारचे वादळ निर्माण झालं होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. आजही रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकहाणीची चर्चा होताना दिसते. रेखा आजही सिंगल असली तरी अमिताभ यांच्याशिवाय तिचे अनेक अफेअर्स हे चर्चेत राहिले होते. या प्रकरणामुळे जया बच्चन आणि रेखा यांच्या नात्यातही वेगळ्या प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता. परंतु त्यावेळी फक्त जया बच्चनच नाही तर इतरही काही अभिनेत्रींशी रेखाचा 36 चा आकडा तयार झाला होता. त्यामुळे त्यांच्या अबोल्याचीही बी-टाऊनमध्ये चर्चा रंगलेली दिसली होती. आता त्याच लोकप्रिय अभिनेत्रींविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये गॉसिप रंगत त्याप्रमाणे तेव्हाही म्हणजे 70-80 च्या काळातही बॉलिवूडच्या कपल्सबद्दल, त्यांच्या रिलेशनशिप्सबद्दल मोठं गॉसिप रंगायचे. त्यातून सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे रेखा आणि अमिताभ बच्चन यांची. रेखासोबत जया बच्चन यांच्याही भांडणाची तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती. त्यातून रेखासोबत फक्त जया बच्चनच नाही तर या काही लोकप्रिय अभिनेत्रीही तिच्या नावानं कडाकडा बोटं मोडायच्या. जेव्हा रेखा या यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या तेव्हा त्यांचे अनेक अभिनेत्यांशी नाव जोडले गेले होते. त्यांच्यातही इतका दुरावा झाला होता आणि त्यांनीही एकमेकांचे तोंड पाहणं सोडून दिले होते. 


रेखाचे जया बच्चनशिवाय नर्गिस आणि मौषमी चॅटर्जीही खूप वाद होते. 1984 साली आलेल्या जमीन आसमान या चित्रपटाच्यावेळी त्या दोघींचे भांडण झाले होते. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार असं कळतं की, रेखा यांच्यावर नर्गिस प्रचंड चिडायच्या कारण तेव्हा रेखा आणि संजय दत्तच्या अफेअरसनाही सुरूवात झाली होती. तेव्हा नर्गिसही तिला वाईटसाईट बोलायच्या. 1976 साली एका मुलाखतीत नर्गिस यांनी म्हटलं होतं की, रेखा ही कुठल्या डायनपेक्षा कमी नाही. ती पुरूषांना जाळ्यात अडकवते. तिला एका सशक्त पुरूषाची गरज आहे. 


हेही वाचा  - Eiffel Tower खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, Romantic Photo व्हायरल


मौषमी चॅटर्जीसोबतही रेखाचे फिस्कटले होते. 'भोला भला' या चित्रपटाच्या वेळी मौषमी यांच्याआधी रेखाचं नावं पोस्टवर निर्मात्यांनी लिहिले होते. हे मौषमी यांनी आवडलं नाही आणि मग त्यांनी आपल्या जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून त्याही एकमेकांशी बोलणं बंद झाल्या. 1981 साली नर्गिस यांचे निधन झाले तर मौषमी चॅटर्जी या अद्यापतरी चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.