मुंबई : गेल्या काही दिवसांत अनुष्का शर्मा आई बनल्यानंतर आता प्रियंका चोप्राचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिला ११ मुलांची आई बनायचं आहे आणि तिला एक क्रिकेट टीम बनवायची आहे असं वक्तव्य प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलाच्या प्रश्नावर  प्रियंका चोप्रा भडकली आहे. तसं, प्रियांका ही एकमेव अभिनेत्री नाही जिने लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या करिअरला प्राधान्य दिलं आहे. इतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील लग्नानंतर करिअरला मुलापेक्षा प्राधान्य दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चिडून म्हणाली, दबाव टाकणं थांबवा
निक जोनास आणि प्रियांका चोप्राने डिसेंबर 2018मध्ये लग्न केलं. 2 वर्षे झाली पण आजपर्यंत या कपलकडून गुडन्यूज आलेली नाही. 11 मुलांविषयीच्या वक्तव्यावर प्रियांकाने अलीकडेच सांगितलं की, हे तिचं खूप जुनं विधान आहे. या प्रश्नावर ती चिडली आणि म्हणाली की, फक्त तिच्या चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारले पाहिजेत आणि जेव्हा तिला योग्य वाटेल तेव्हा तिला आणि निकला मुले होतील.


या कपल्सने केलं आधी करिअरवर लक्ष केंद्रित
विराट कोहली-अनुष्का शर्मा 11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबद्ध झाले. मात्र, लग्नानंतर विराट आणि अनुष्का यांनी आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. लग्नानंतर अनुष्काने केवळ तिच्या फिल्मी करिअरवरच लक्ष केंद्रित केलं नाही तर तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अलीकडे, 11 जानेवारी रोजी अनुष्का तिच्या पहिल्या मुलाची आई बनली.


दीपिका-रणवीरही त्यांच्या करिअरवर लक्षकेंद्रित करत आहेत
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर 2018मध्ये लग्न केलं. मात्र, लग्नानंतर, दोघांनाही मुलं होण्याची घाई नाही आणि दोघंही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत.