मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही? पण चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी किंग खानचे स्टारडम बाजूला ठेवून बादशाहच्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. शाहरुखला रिजेक्ट केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. या यादीमध्ये चक्क दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा देखील समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)




अभिनेता शाहरुख खान स्टारर दिग्दर्शक एटलीच्या चित्रपटाला नकार दिल्याने दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा चर्चेत आहे. सामंथाने हा चित्रपट का नाकारला याचे नेमके कारण उघड झालेले नाही. पण अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू, जी दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. तिने  शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे सर्वचं हैराण झाले.


श्रीदेवी (Sridevi)




 दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी देखील शाहरुख सोबत काम करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, 'डर' चित्रपटासाठी सर्वप्रथम श्रीदेवी यांना प्राधान्य देण्यात आलं होतं. पण श्रीदेवी यांनी नकार दिल्यानंतर चित्रपटात अभिनेत्री जुही चावलाची वर्णी लागली. 


करिश्मा कपूर (Karisma Kapoor)




करिश्मा कपूरने शाहरुखला फक्त एका चित्रपटासाठी नाही तर तब्बल दोन चित्रपटांसाठी नकार दिला. 'कुछ कुछ होता है' चित्रपटासाठी सर्वप्रथम करिश्माला विचारण्यात आलं. तिने नकार दिल्या नंतर तिच्या जागी अभिनेत्री राणी मुखर्जीने 'टीना' ही भूमिका साकारली. 


सोनम कपूर (Sonam Kapoor)




सोनम कपूरने अद्याप शाहरुख खानसोबत काम केलेले नाही. शाहरुख खानसोबतची तिची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडणार नाही असं सांगत तिने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला.