श्रीदेवी-माधुरी नाही तर `या` अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती `ही`
This Actress Made 1000 cr on Box Office : अभिनेत्री राम्या कृष्णननं आजवर सगळ्यात जास्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं होत. पण बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय करत सगळ्यांच्या मनात छाप सोडली आहे. बॉलिवूड ते दाक्षिणात्य चित्रपटांमधील कामाची नेहमीच स्तुती होते. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी बाहुबली या चित्रपटात काम केलं आणि त्या चित्रपटानं 1000 कोटी आकडा पार केला होता. तर हा पहिला चित्रपट होता ज्यानं बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा आकडा पार करणार आहे.
राम्या यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात ‘बाहुबली’ आणि 'खलनायक' सारखे चित्रपट आहेत. त्या जेव्हा अभिनय करतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष हे फक्त त्यांच्याकडेच असते. राम्या यांनी त्यांच्या करियरमध्ये केलेले अनेक चित्रपट हे ब्लॉकबस्टर ठरले.
राम्यान यांनी वयाच्या 45 व्या वर्षी प्रभासची आई शिवगामीची भूमिका साकारत इतिहास रचला होता. त्यांचे डायलॉग्स आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ते दोघे त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या अभिनयाची खूप स्तुती झाली होती. त्यासोबत त्यांनी हे देखील सिद्ध केलं की त्या आजही कोणत्याही धाटनीच्या भूमिका साकारू शकतात. या भूमिकेतून त्यांनी फक्त दाक्षिणात्य प्रेक्षक नाही तर त्यांच्यासोबत पॅन इंडिया आता त्यांना शिवगामी या नावानं ओळखतात.
1993 मध्ये राम्या यांनी संजय दत्तसोबत 'खलनायक' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे संजय दत्त आणि राम्या यांच्या केमिस्ट्रीची. या चित्रपटातील 'नायक नहीं.... खलनायक हूं मैं' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये हे गाणं ऐकायला मिळतं.
हेही वाचा : 'कंडोम वापरा आणि...', LIVE Show मध्ये अक्षय कुमारचं विधान ऐकून सैफ अली खानला हसू अनावर; नेमकं घडलं काय?
राम्या यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी यश चोप्रा यांच्या 'परंपरा' या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याशिवाय डेव्हिड धवन यांच्या कॉमेडी 'बनारसी बाबू' आणि 'बडे मियां छोटे मिया' या चित्रपटात देखील दिसल्या होत्या. त्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.