Vindoo Dara Singh on Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारनं सलमानला बॉलिवूड सुपरस्टारला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत कथितपणे लॉरेंस बिश्नोईच्या गॅंगनं ठार मारलं. सलमानसाठी वाढवलेली सुरक्षा हे चिंतेचं कारण आहे. दरम्यान, सलमाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विंजू दारा सिंगनं इंडस्ट्रीमध्ये असलेल्या अस्थितरतेवर त्याचं काय म्हणणं आहे ते सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंजू दारा सिंगनं इंस्टंट बॉलिवूडशी इंडस्ट्रीमध्ये सतत होणाऱ्या घटनेवर म्हटलं आहे की 'तुम्ही समजून घ्यायला हवं. एका वेगळ्याच प्रकारचं कायदा आहे. हे सगळ्यात चांगलं आहे कारण हे कोर्ट आहे. सगळं काही आहे आणि आतापर्यंत कोणालाच सत्य काय आहे ते कळलेलं नाही. काहीच सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे हे जे काही होत आहे. ते खूप हैराण करणारं  आणि विश्वास न बसणारं आहे. मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की लोकांना समजतं आणि सलमानला काही व्हायला नको.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याच्या प्रकरणात लॉरेंस बिश्नोई गॅंगचा शूटर सुक्खा उर्फ सुखबीर बलबीर सिंगला अटक केली. त्याची आज कोर्टात पेशी होती. सलमानची हत्या करण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पाकिस्तानमधून एके 47, एके 92 आणि एम 16 आणि तुर्की मेड जिगाना सारखी हत्यारे खरेदी करण्याची सगळी प्लॅनिंग केली होती. 


पोलिसांप्रमाणे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं आहे की पनवेलच्या फार्महाऊसवरच सलमानवर हल्ला करण्याची प्लॅनिंग होती. हा सगळा कट गेल्यावर्षी ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 च्या मध्ये करण्यात येईल. अटक करणाऱ्यांमध्ये पाकिस्तामधून अत्याधुनिक शस्त्रे पाकिस्तानमधून एके 47, एके 92 आणि एम 16 आणि तुर्की मेड जिगाना इतकी हत्याचे खरेदी करण्याची तयारी होती. अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करण्याचं कारण हे सलमानची सुरक्षा आणि बुलेट प्रूफसोबत फिरणं हे आहे.