मुंबई: लोकप्रिय रॅपर ड्रेक के याचे ‘इन माय फीलिंग्‍स’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय झाले आहे. विशेष म्हणजे हॉलिवूड कलाकारांसोबत आता देसी कलाकारांमध्येही #KikiChallengeची झिंग चढू लागल्याचे पहायला मिळत आहे. सेलिब्रेटीच काय पण, सर्वसामान्य तरूणाईसुद्धा हे धोकादायक चॅलेंज स्वीकारत आहे. स्वीकारलेल्या चॅलेंजचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. या चॅलेंजमधील धोका ओळखून पोलिसांनी आगोदरच सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण, तहीरी #KikiChallengeचा हा ट्रेंड फॉलो करणे काही कमी होताना दिसत नाही.


नागीण स्टाईलमध्येही #KikiChallenge



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#KikiChallenge आणि #InMyFeelingsChallenge हा ट्रेंड फॉलो करताना लोक चालत्या गाडीतून उतरून रस्त्यावर डान्स करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत नोरा फतेहीने लाल साडीत हे चॅलेंज स्वीकारले होते. त्यानंतर आता अभिनेत्री अदा शर्मानेही खास नागीण अवतारात चॅलेंज पूर्ण केले. पण, मजेशीर असे की, अदा शर्मा गाडीतून उतरून डान्स तर करतेय पण, गाडी जागेवरच उभी आहे.


सावधान! हे चॅलेंज स्वीकारने म्हणजे जीव धोक्यात घालने



दरम्यान, चालत्या गाडीतून उतरून रस्त्यावर डान्स करताना अनेकांचे अपघात झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. तेव्हा तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारत असाल तर, सावधान. दरम्यान, पोलिसांनीही इशारा दिला आहे की, इथे जर कोणी हे चॅलेंज स्वीकारताना दिसले तर त्याच्यावर दंडासह योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, कॅनेडीयन रॅपर ड्रेकच्या In My Feelings या गाण्यावर लोक डान्स करताना दिसतायत. पण, विशेष असे की, मूळ गाण्यात कुठेच असा डान्स नाही. 


विल स्मिथनेही केला डान्स



हॉलिवूडचा अभिनेता विल स्मिथनेही हे चॅलेंज स्वीकारत डान्स केला आहे.


नोरा आणि वरूनचाही अनोखा अंदाज



दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये भारतातही या चॅलेंजचा ट्रेंड आहे. #KikiChallenge स्वीकारताना अनेकांना दुखापतींचा सामना करावा लागला आहे. पण, तहीरी अनकांच्या डोक्यात हे वेड आहेच. विशेष असे की, नोरा फतेहीसोब वरून शर्मानेही देसी स्टाईलमध्ये हे चॅलेंज स्वीकारले.