मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान आता छोट्या पडदयावर समोरा-समोर दिसणार आहेत. हे दोघांना एकमेंकांची नक्क्ल करताना आपण पाहिलं आहे. पण एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आता बॉलिवूड किंग खानचा टीव्ही शो. 'टेड टॉक : नई सोच' आणि भाईजानचा रियालिटी शो 'बिग बॉस ११'  हे एकाच वेळेला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख आपला शो 'टेड टॉक : नई सोच' चा प्रोमो १९ ऑगस्ट ला शूट करणार आहे. तर सलमान आपला शो 'बिग बॉस ११' चा प्रोमो ३० जुलै ला शूट करणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिआरपीच्या बाबतीत सलमान, शाहरूख खान दोघंही पुढे आहेत. या आधीपण शाहरूख खानने 'कोन बनेगा करोडपती' आणि 'पांचवी पास' शो होस्ट केले होते. पण टीव्ही वर लोकांना तो एवढा आवडला नाही. अभिनेता शाहरूख खानचा हा नविन शो 'स्टार प्लस' वर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे तर अभिनेता सलमान खानचा शो 'कलर्स' वर रात्री १०.३० वाजता प्रसारित केला जाईल. अभिनेता सलमान खान गेल्या अनेक सीझनपासून 'बिग बॉस' हा शो होस्ट करत आहे.

बॉलिवूडचा किंग खानने एका मुलाखतीत आपल्या या शोचे शुटींग हे ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे असं बोलला होता. तर सप्टेंबर आणि अक्टोबर या महिण्यात हा शो प्रसारित करण्यात येईल असं देखील त्याने म्हटलं होतं. पुन्हा एकदा हे दोघंही स्टार्स नंबर एकच्या लढतीत दिसणार आहे. त्यामुळे कोणाचा शो किती चालतो हे पाहावं लागणार आहे.