आता IAS अधिकाऱ्यासोबत सनी लिओनी करणार काम, लवकरच दिसणार एकत्र
Sunny Leone will work with IAS Officer : आता लवकरच सनी लिओनी करणार आयएएस अधिकाऱ्यासोबत काम. IAS अधिकाऱ्यानं स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा.
IAS Abhishek Singh rap song with Sunny Leone : यूपीचा सगळ्यात चर्चेत असणारा आयएएस अभिषेक सिंह आता एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. आयएएसची नोकरी सोडत अभिषेक सिंह बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टीची सुरुवात ही अभिनेत्री सनी लियोनीसोबत झालेल्या रॅप सॉन्गनं होणार आहे. याची माहिती स्वत: अभिषेक सिंह यांनी दिली आहे. नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया.
अभिषेकनं सिंह यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यात त्यांनी सनी लिओनीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता लवकरच त्यांचं एक रॅप सॉन्ग येणार आहे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी सनी लिओनीसोबत जौनपुरला येणार आहे. त्यांनी याविषयी सांगत म्हटले की त्यांनी रॅप सॉन्गचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यात त्यांनी म्हटलं होतं की हे गाणं त्यांनी स्वत: गायलं आहे. यात कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतली नाही. या गाण्याचं नाव 'मेरी पार्टीमें कोई थर्डी पार्टी नहीं' असं आहे. या व्हिडीओत सनी ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे.
अभिषेक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर अभिषेक यांनी म्हटलं की त्यांना या गोष्टीची आशा आहे की हे गाणं सगळ्यांना नक्कीच आवडेल. हा व्हिडीओ शेअर करत आयएएसनं अभिषेक यांनी लिहिलं की, 'तुमच्या सगळ्यांशी लवकरच भेटेन.' त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत की त्यांना खूप जास्त उत्सुकता आहे. एक नेटकरी म्हणाली की, 'आयएएस अभिषेक बीएचयू कॅम्पसमध्ये नक्कीच या.' तर त्याचं उत्तर देत अभिषेक म्हणाले, 'तुम्ही बोलावलं तर नक्कीच.'
दरम्यान, अभिषेक हे उत्तर प्रदेश कॉडरचा आयएएस अधिकारी होते आणि त्यांनी नुकतंच राजिनामा दिला आहे. 2021 मध्ये त्यांनी गुजरात निवडणूकी दरम्यान, सरकारी गाडीसमोर फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणातून त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूकीचे ऑब्जर्वर म्हणून पाठवण्यात आले होते. या प्रकरणानंतर अभिषेक सिंग यांनी भारतीय प्रशासनिक सेवेला राजिनामा दिला होता. अभिषेक सिंह यांचे वडील देखील आयएएस होते. तर दुसरीकडे अभिषेक यांची पत्नी दुर्गाशक्ति नागपाल देखील यूपीच्या चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी आहेत.