Actor takes 50 cr for one Movie : दाक्षिणाच्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार म्हणून चिरंजीवी ओळखले जातात. चिरंजीवी यांना या चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिरंजीवी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी देखील सांगितलं आहे. चिरंजीवी यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरंजीवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला फोटो हा एका कार्डमधला आहे. त्यांनी चिरंजीवी यांनी पोस्ट केलेला हा फोटो त्यांच्या पहिल्या नाटकाच्या वेळचा आहे. त्यांचं पहिलं नाटक हे 'रंगस्थलम' वर आधारित आहेत. जे त्यांनी YNM कॉलेज नर्सापुरमध्ये केलं होतं. त्या नाटकासाठी चिरंजीवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला होता. चिरंजीवी यांनी 1974 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि आता त्यांना आता 50 वर्ष पूर्ण झाले होते. 



चिरंजीवी यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांना इन्स्पेरिशन म्हटलं आहे. चिरंजीवी यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 150 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत आणि त्याशिवाय त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर हिट दिलेत. त्यांच्या अभिनयासोबत त्यांची स्टाईलनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 


अमिताभ यांच्या पेक्षा जास्त मानधन घ्यायचे


कधी असा देखील काळ होता जेव्हा चिरंजीवी यांना 'बिगर दॅन बच्चन' म्हणू लागले होते. तेव्हा चिरंजीवी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घ्यायचे. रिपोर्ट्सनुसार, चिरंजीवी हे त्यांच्या चित्रपटासाठी 1.25 कोटी मानधन घ्यायचे तर अमिताभ हे फक्त 1 कोटी मानधन घ्यायचे. इतकंच नाही तर 90 च्या दशकात तर ते मॅगझिनच्या कव्हरवर सतत दिसायचे. दरम्यान, चिरंजीवी हे देशातले पहिली अभिनेते आहेत. ज्यांनी सगळ्यात आधी 1 कोटी मानधन घेतलं होतं. तर आता ते एका अॅक्शनपटासाठी 50 कोटी मानधन घेतात असं रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते. 


हेही वाचा : चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाला होता रणवीर सिंग; भूमिकेसाठी उचलली जोखीम


चिरंजीवी यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते आता गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणाऱ्या 'विश्वंभरा' या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक आतुरतेनं या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. चिरंजीवी यांच्या या चित्रपटाचं बजेट हे 200 कोटी असल्याचं म्हटल आहे. तर या चित्रपटात चिरंजीवी यांच्या व्यतिरिक्त तृषा, कुणाल कपूर, मीनाक्षी चौधरी आणि अशिका रंगनाथ दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.