Ek Daav Bhootacha : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव या अष्टपैलू अभिनेत्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोकं उत्सुक आहेत. या दोघांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी आता 'एक डाव भूताचा' या चित्रपटातून मिळणार आहे. त्या चित्रपटाची सगळीकडे सध्या चर्चा सुरु असतानाच हा चित्रपट उद्या 4 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर जेव्हा प्रदर्शित करण्यात आलं तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट आता तुम्हाला अवघ्या 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. पहिल्याच दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. या चित्रपटाचं पोस्टर, टीझर आणि ट्रेलर पाहता एकंदरीत टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने 'एक डाव भुताचा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, आशय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत.


हेही वाचा : ...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा


स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट "एक डाव भुताचा"' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.