दिग्गज सुपरस्टारच्या मुलीची आत्महत्या, 12 मुलांपैकी सर्वांत लहान लेकीने घेतला अखेरचा श्वास
लहान लेकीच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर... मृत्यूचं कारण...
मुंबई : दिग्गज सुपरस्टारच्या मुलीने अखेरचा श्वास घेतल्यामुळे कलाविश्वात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एनटी रामाराव यांची मुलगी कंठमनेनी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केली आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या. ही धक्कादायक घटना सोमवारी 01 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. उमा माहेश्वरी 12 भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या.
उमा माहेश्वरी यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे. दरम्यान, आरोग्यासंबंधीत काही अडचणींमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्यांच्या मृत्यूचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या आत्महत्येमागे त्याची वैद्यकीय स्थिती असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
उमा माहेश्वरी यांना एक दीक्षिता नावाची मुलगी आहे. दुपारी 12 नंतर आई खोली बाहेर येत नसल्याचं कळताच दीक्षिताने पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर उमा माहेश्वरी सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत उमा आढळून आल्या होत्या. अशी माहिती मिळते आहे की ही घटना घडली तेव्हा घरामध्ये चार जण उपस्थित होते.
एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी उमा सर्वात लहान
एनटी रामाराव यांनी 12 मुले होती. त्यांना आठ मुले आणि चार मुलींमध्ये उमा माहेश्वरी सर्वात लहान होत्या. नुकतेच उमा माहेश्वरी यांच्या मुलीच्या लग्नात अनेक कुटुंबीय एकत्र आले होते.