प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर नुसरत जाहां यांच्याकडून फोटो शेअर; बेबी बम्प मात्र...
पाहा फोटो...
मुंबई : टीएमसी खासदार नुसरत जहां सध्या तुफान चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा रंगत आहे. मध्यंतरी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्याममध्ये नुसरत गरोदर असल्याचं दिसून आलं. आता खुद्द नुसरत यांनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये त्या बेबी बम्प लपवताना दिसत आहेत. आता शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाची टॉप, निळ्या रंगाची जिन्स आणि गुलाबी रंगाचा स्कार्फ गुंडाळला आहे. फोटोंमध्ये त्यांचं बेबी बम्प स्पष्ट दिसत नाहीत.
फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'प्रेमळ स्वभाव सर्व काही बदलू शकतो...' असं लिहिलं आहे. नुसरत यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अद्याप नुसरत यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीवर कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री-खासदार नुसरत जहांचं वैवाहिक जीवन संकटात आलं आहे. यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहांच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत जहां सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. दोघेही एकमेकांच्या घरी जातात. नुसरत लवकरच निखिलला घटस्फोट घेणार असल्याचं कळत आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.