मुंबई : बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूलची खासदार नुसरत जहाँ हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते. ती पॉलिटिक्समध्ये सक्रीय असलेल्या सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. नुसरत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. विशेषतः नुसरतचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहते. काही महिन्यांपूर्वी नुसरत आई झाली आहे. आई झाल्यानंतर नुसरत आणखी सुंदर दिसू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच नुसरतने एक फोटोशूट केला आहे, जो चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये नुसरत फारच सुंदर दिसत आहे. 


या फोटोंमध्ये अभिनेत्रीने बेबी पिंक कलरच्या फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात दिसत आहे. त्यावर पिवळ्या रंगातील फंकी कानातले घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.


त्याचबरोबर तिने फिकट गुलाबी रंगाचा मेकअप केला आहे. तसेच नुसरतने तिचे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.



नुसरतने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. आता तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक त्याची स्तुती करताना थकत नाहीत.


दुसरीकडे, नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुसरतचे अनेक चित्रपट रिलीजच्या रांगेत आहेत. ती लवकरच 'जय काली कलकत्तेवाली' आणि 'मास्टर मोशाई अपनी किचू देखेन्नी' या बंगाली चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.