मुंबई : अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँचं वैवाहिक जीवन संकटात आलं आहे. यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहाँच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दिर्घ काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर नुसरत जाहाँ आणि पती निखिल जैन (Nikhil Jain)यांनी 2019 साली लग्न केलं. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जाहाँ आणि निखिल जैन विभक्त होणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहे. तर सध्या नुसरत जाहाँ सहकलाकार अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. नुसरत जाहाँ यांच्याबद्दल पसरत असलेल्या चर्चांना खुद्द त्यांनी पूर्णविराम दिला आहे. 


नुसरत म्हणाल्या, 'माझ्या वैयक्तिक आयुष्यातील बाबी लोकांसाठी नाहीत. लोकांनी अशा परिस्थितीत नेहमी माझी परीक्षा घेतली आहे. पण आता मी भाष्य करणार नाही. जे काही आहे. चांगलं आहे, वाईट आहे.. ते फक्त माझं खासगी आयुष्य असल्याचं सांगतं त्यांनी या विषयाला पूर्णविराम दिला. 



दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.