COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सेक्रेड गेम्सनंतर सैफ अली खान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सैफने सेक्रेड गेम्समध्ये पंजाबी पोलिस सरताज सिंह साकारल्यानंतर आता 'बाजार' या सिनेमांत वेगळा सैफ अनुभवता येणार आहे. सैफ या सिनेमात एका गुजराती बिझनेसमन शकुन कोठारीची भूमिका साकारत आहे. 


सैफ अली खानच्या 'बाजार' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. यामध्ये सैफसोबत राधिका आपटे, रोहन खन्ना, विनोद मेहरा सारखे कलाकार आहेत. हा सिनेमा गुजराती शकुन कोठारी आणि एका छोट्या शहरात मुंबईत आपलं नशीब अनुभवण्यासाठी आलेल्या रिझवान अहमद याची ही कथा आहे. हा सिनेमा शेअर मार्केटवर आधारित आहे. सेक्रेड गेम्सनंतर सैफ आणि राधिका ही जोडी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. 


चित्रांगदा या सिनेमात मंदिरा कोठारीची भूमिका साकारत आहे. जी सैफ अली खानची पत्नी आहे. तसेच राधिका आपटे एक महत्वकांक्षी प्रिया मल्होत्राची भूमिका साकारत आहे. 'बाजार' हा सिनेमा सैफसाठी खूप खास आहे. 2013 मध्ये आलेल्या "रेस 2'' नंतर कोणताही मोठा हिट सिनेमा दिलेला नाही. हा मल्टीस्टारर सिनेमा 26 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.