मुंबई : सोशल मीडियावर दर दिवसाला म्हणण्यापेक्षा दर क्षणाला काही व्हिडीओ व्हायरल होत असतात असंच म्हणणं योग्य ठरणार आहे. विविध विषांवर भाष्य करणारे, अनेकदा काहीही संबंध नसणारे तरीही प्रकाशझोतात येणारे हे व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. शेअर केले जातात. अगदी सेव्हही केले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक गोड व्हिडीओ सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे. व्हिडीओमध्ये दोन वृद्ध (एक आजी आणि एक आजोबा) 'प्यासा' या गुरुदत्त यांची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटातील गाणं गाताना दिसत आहेत. 


'जाने वो कौसे, लोग थे... ' हे गाणं त्यांनी त्यांच्याच सुरेल आवाजात गायलं आहे. वयाचा आकडा पुढे गेला असला, तरीही त्यांची मनं मात्र अद्यापही चिरतरुण असल्याचं हे गाणं ऐकताना जाणवत आहे. डोळे बंद करून हे गाणं ऐकताना नकळतच गाण्याचे शब्द काळजार चर्रsss करत आहेत. 




सोशल मीडियावर असणाऱ्या माहितीनुसार ते दोघंही बहीण भाऊ आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आजोबांचं नाव जमशेद ओमर असून, आजींचं नाव शमा हुसैन आहे. मागील वर्षीच या आजोबांचं निधन झालं. पण, या व्हिडीओच्या निमित्तानं पाकिस्तानातील भावा- बहिणीच्या या जोडीला जगभरातून असिमीत प्रेम मिळताना दिसत आहे. (old cousin sibling duo sings jane vo kaise song video winning hearts on instagram )