20 वर्ष जुना वाद विसरून अक्षय - रवीना पुन्हा एकत्र येणार?
Akshay Kumar and Raveena Tandon : अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांची केमिस्ट्री कधी काळी सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. अक्षय आणि रवीना हे दोघं जवळपास दोन दशकांपासून एकत्र काम करत नव्हते. तर आता ते दोघं लवकरच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Akshay Kumar and Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांच्या रिलेशनशिपविषयी अनेकांना माहित आहे. रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यात असंही म्हटलं जात होतं की त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. अचानक त्यांच्यात दुरावा आला आमि त्या दोघांनी लग्न केलं नाही. तर पर्सनल लाइफमध्ये ते दोघं पुढे गेले. इतक्या वर्षांनंतर ते दोघे ते विसरले. काही दिवसांपूर्वी रवीनाला अक्षय कुमारची स्तुती केली. आता चर्चा अशी आहे की ते दोघं लवकरच एकत्र दिसणार आहेत.
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचं नातं आता खूप चांगलं झालं आहे. एकदा एक चर्चा सुरु असताना रवीना टंडननं अक्षय कुमारला बॉलिवूडचा सगळ्यात स्ट्रॉंग असलेल्या लोकांपैकी एक असल्याचं सांगितलं. त्या दोघांच्या मनात एकमेकांविरोधात असलेल्या सगळ्या गोष्टी आता संपल्या आहेत असं म्हणालयला हरकत नाही. पण कामाविषयी बोलायचे झाले तर दोन दशकांपासून त्या दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. अक्षय कुमारला पुन्हा एकदा रवीना टंडनसोबत काम करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघं लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 'वेलकम 3' मध्ये ते दोघं स्क्रिन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचं नाव 'वेलकम टू द जंगल' असे असणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, अरशद वारसी, सुनील शेट्टी, दिशा पटानी आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
चित्रपटाच्या कास्टिंग विषयी बोलायचे झाले तर त्यावर अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रवीना टंडननं काही महिन्यांपूर्वी मोहरा या चित्रपटातील टिपटिप बरसा पानी या गाण्यावर चर्चा केली होती. कारण त्या गाण्यात ती आणि अक्षय एकत्र दिसले होते. याविषयी बोलताना रवीनानं सांगितलं होतं की तिनं आधीच निर्मात्यांना सांगितलं होतं की त्या चित्रपटातील गाण्यात किसिंग सीन नसेल.
हेही वाचा : तब्बल 150 मुलींना नाकारणाऱ्या Reality Star वर पत्नीकडूनच घरगुती हिंसाचाराचा आरोप...
एका मुलाखतीत लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी म्हटलं होतं की रवीना हे गाणं करण्याआधी थोडं घाबरत होती. त्यांचं म्हणणं होतं की तिच्या वडिलांना हे सगळं आवडत नाही. यावर दिग्दर्शक राजीवर रॉय यांनी रवीनाला सांगितलं की तू तुझ्या वडिलांना हा चित्रपट नको दाखवूस. त्यानंतर रवीनानं त्यासाठी अनेक अटी ठेवल्या आणि मग ती या गाण्यासाठी तयार झाली.