Om Puri's First Love was 55 year old made : बॉलिवूड चित्रपट अभिनेता ओम पुरी आज आपल्यासोबत नसले तरी त्यांचे लाखो चाहते आहेत. ओम पुरी यांचं नाव दिग्गज कलाकारांपैकी एक होते आणि कायम राहतील. आज 18 ऑक्टोबर ओम पुरी यांची आज जन्म दिवस आहे. त्या निमित्तानं आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया. 


ओम पुरी यांनी केलंय खूप स्ट्रगल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओम पुरी यांचा हरियाणातील, अंबाला येथे एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ओम पुरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, त्यांनी आयुष्यात किती मेहनत आणि स्ट्रगल केलं याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. ओम पुरी यांच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की ते कोळसा वेचून पोट भरायचे. ओम पुरी यांचे जीवन हे वादग्रस्त होते असे नेहमीच म्हटले जात होते. त्यांच्या पत्नीनं त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. 


ओम पुरी यांच्या पत्नी नंदितानं त्यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात खुलासा केला होता की 14 वर्षांच्या ओम पुरी यांनी 55 वर्षांच्या मोलकरनीसोबत सेक्स केलं होतं. पुरी हे त्यांच्या मामाच्या घरी काम करणाऱ्या 55 वर्षांच्या मोलकरीवर प्रेम करु लागले होते. त्याविषयी लिहिताना त्यांच्या पत्नीनं म्हटलं की 'एक दिवस घराची लाईट गेली. ते पाहता मोलकरणीनं 14 वर्षांच्या ओम पुरी यांनासोबत घेऊन जात त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ती मोलकरणी ही ओमपुरी यांची पहिली प्रेयसी होती. तर ओम पुरी यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या पुस्तकाचे नाव ‘असाधारण नायक ओमपुरी’ आहे. याशिवाय नंदिता यांनी आणखी एक खुलासा केला होता की ओम पुरी यांना त्यांच्या पेक्षा वयानं मोठ्या महिला आवडतात. त्यांच्याकडे ते आकर्षित होतात. त्यांच्या या पुस्तकानंतर त्या दोघांमध्ये दुरावा आला', असे नंदिता यांनी सांगितले होते. 


हेही वाचा : इस्रायल-हमास युद्धात उतरणार नुसरत भरुचासोबत काम करणारा 'हा' अभिनेता


ओम पुरी यांचा अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा दर्जेदार अभिनय पाहून त्यांना हॉलिवूडमधून ऑफर मिळू लागल्या होत्या. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओम पुरी यांना इंग्रजी येत नव्हती आणि इंग्रजीशिवाय हॉलिवूडमध्ये काम करण शक्यच नव्हतं. यागोष्टीला देखील त्यांनी मागे टाकले. त्यांनी त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यातच ते इंग्रजी शिकले.