Akshay Kumar OMG 2: अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कामगिरी केली आहे. सोबतच हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीच उतरला आहे. Sex Education हा विषय अजूनही रूपेरी पडद्यावर हाताळणं कठीण असते. त्यातून लैंगिक शिक्षण, संबंध आणि त्याविषयीच्या अनेक गोष्टी तरूणांना खासकरून वयात येणाऱ्या मुलांना याविषयीची माहिती देणं फार आवश्यक असते. या चित्रपटातून हा संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाला सेन्सॉरशिपही मिळाली होती तसेच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ''A'' सर्टिफिकेटही दिले आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील अनेक सीन्स आणि डायलॉग्सवर कात्रीही मारली होती. त्यातील संवाद आणि काही दृश्यांवर कात्रीही लावली होती. परंतु आता हा चित्रपट संपुर्ण अनकट ओटीटीवर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी याची माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे. 


पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद राय म्हणाले आहेत की, ''मला खूप आनंद झाला आहे या चित्रपटाला आणि या चित्रपटाच्या या संवेदनशील विषयाला प्रेक्षकांनी फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. आम्हाला फार दु:ख झाले होते की ही फिल्म आम्ही सगळ्यांसाठी बनवली होती. त्यातून ही या फिल्मला ''A'' सर्टिफिकेट मिळाले होते. परंतु आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खूपदा विनंती केली होती की, निदान या चित्रपटाला त्यांनी U/A सर्टिफिकेट द्यावे. परंतु ते काहीच शक्य झाले नाही. आम्हाला वाटलं हे सर्टिफिकेट दिल्यानं 12 वर्षाखालील मुलं आपल्या पालकांसोबत पाहू शकतील. मग शेवटी काही बदल करण्यात आले.''


हेही वाचा : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार


या चित्रपटाचा संपुर्ण अनकट व्हर्जन आता ओटीटीवर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली यावेळी ते म्हणाले की, ''सेन्सॉर बोर्डानं जो भाग कापला ते सर्व भाग आम्ही आता अनकट पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत. त्यातून आता या चित्रपटाला किती चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याचा प्रत्यय आलेला आहे. परंतु हे सेन्सॉर बोर्डाला मात्र कळलं नाही. आता काय बोलायचे?'', असं ते म्हणाले. अनेकांनी ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटावर टीकाही केली होती. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली होती.