मुंबई : चर्चेत राहण्यासाठी कायम राखी सावंत नवनवीन फंडे शोधत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नानंतर राखी सावंतने केलेलं ट्विट भरपूर चर्चेत होते. विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा देत राखीने त्यांना कंडोम गिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. एवढंच नाही तर आपण ज्या जाहिरातीसाठी काम करतेय ते कंडोम गिफ्ट करणार असल्याचं सांगितलं. तर त्या पुढे जाऊन कंडोम वापरून आपला अनुभव शेअर करण्याचा फुकटचा सल्ला देखील राखीने दिला आहे. 


राखी सावंतच्या या दोन्ही वक्तव्यावरून तिच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. राखी सावंत कायम अशी वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. आणि आताचा तिचा हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 


विरूष्काला काय म्हणाली? 


 त्या ब्रॅण्डचे पहिले ग्राहक अनुष्का आणि विराट या दाम्पत्याने बनावे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचा अनुभवही लोकांशी शेअर करावा. काही दिवसांपूर्वीच राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना तिच्या फेव्हरेट कंडोम फ्लेवरची माहिती दिली होती. या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. 


 तसेच कंडोम जाहिरातीच्या प्रसारणावर सरकारने घातलेल्या बॅनवरही राखीने सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, आता राखीने विरुष्काबद्दल वक्तव्य करून पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. राखीने म्हटले की, ‘विराट कोहली आणि अनुष्का शर्मा खूपच प्रेमळ कपल आहे. या दोघांनी आताच त्यांच्या वैवाहिक जीवनात पाऊल ठेवले आहे. मी माझ्या ब्रॅण्डचे कंडोम त्यांना गिफ्ट करू इच्छिते. जेणेकरून ते सुरक्षित राहावेत. तसेच मला असे वाटते की, त्यांनी त्यांचे अनुभव लोकांशी शेअरही करावेत.  


रामदेव बाबाला दिलं चॅलेंज? 
 
अनुष्का आणि विराट यांना गिफ्ट देण्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर आता राखीने एक वेगळेच वक्तव्य केले आहे. तिने आता पंताजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांना एक आव्हान दिले आहे. बाबा रामदेव यांनी पतांजलीचा कंडोम लाँच करावा असे तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. राखीने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओत म्हटले आहे की, बाबा रामदेव जर तुमच्यामध्ये दम असेल तर पतांजली कंपनीच कंडोम बाजारात आणा.