`ओंकार भोजनेलापण साडी नेसायला लावली...`, प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी केलं निलेश साबळेला ट्रोल
Omkar Bhojne And Bhau Kadam Trolled : ओंकार भोजनेला शोसाठी साडी नेसवल्यामुळे नेटकरी संतप्त...
Omkar Bhojne And Bhau Kadam Trolled : सध्या सगळीकडे कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या एका नव्या कॉमेडी शोची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं नाव ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ असं आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दिसणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आला आहे. पण या प्रोमोला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी या प्रोमोवरुन ओंकार भोजने आणि भाऊ कदमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्रोमोत ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांनी साडी नेसली असून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील भूमिकांच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यावेळी तिथे 'बाईपण भारी देवा'ची कास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. पण यावेळी ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या कॉमेडीची चर्चा नसून त्यांच्या लूकमुळे एक वेगळीच चर्चा सुरु आहे.
हेही वाचा : 'घरात फक्त 3 प्लेट्स, स्वत: केस कापतो...'; बंगला सोडून फ्लॅटमध्ये का राहू लागला इमरान खान?
हा प्रोमो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला की "बायकांचे रोल करायला बायका मिळत नाहीत का?" दुसरा नेटकरी म्हणाला, "साडी नेसून कॉमेडी करायची काय गरज? मुर्खपणा." तिसरा नेटकरी म्हणाला, "महाराष्ट्राच्या हास्यजत्रेशी काहीच तुलना नाही. ओंकारनं महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पुन्हा जायला हवं." तिसरा नेटकरी म्हणाला, "इथे ओंकार भोजनेला पण साडी नेसायला लावली....फालतुगिरी...." आणखी एक नेटकरी म्हणाला, "काहीतरी नवीन करा. नुसत्या पुरुषांना साड्या नेसवून विनोद होत नाही. बंद करा हि असली थेरं." दुसरा नेटकरी म्हणाला, "भाऊ कदम, तुम्ही खुप चांगले कलाकार आहात पण सारखी सारखी साडी नेसून पांचट विनोद करू नका." तिसरा नेटकरी म्हणाला की "खुप उत्सुकता होती या शोची पण हा प्रोमो पाहून फार निराशा झाली... पहिल्याच भागात ओंकारला साडी नेसायला लावली. नविन काहीच नाही का?" आणखी एक नेटकरी म्हणाला, "कॉमेडी साठी वरचेवर साड्याच का घालाव्या लागतात?" दुसरा म्हणाला," पुन्हा बायकाच का?" यावरुन हे समोर आलं आहे की प्रेक्षकांना ओंकार आणि भाऊ कदमला साडीमध्ये पाहायचं नाही आहे.