मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर कार्तिकचा एक व्हिडीओ भलताचं व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर कलेल्या या व्हिडिओ मध्ये कार्तिक त्याच्या आई सोबत थिरकताना दिसत आहेत. 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातील 'दिल चोरी' गाण्यावर माय-लेकाने ताल धरला आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाला आहे. कार्तिकच्या या व्हिडीओला १३ लाखांपेक्षा अधीक चाहत्यांनी पाहिला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला, 'सोनू के टीटू की स्वीटी सिनेमाने मला अनेक अविस्मरनीय क्षण दिले आहेत. त्यापैकी एका गाण्यवर मी माझ्या आई सोबत 'दिल चोरी' या गाण्यावर डान्स केला.'


कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'लुका छुपी' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर 'लुका छुपी' सिनेमा पाकिस्तान मध्ये प्रदर्शित करण्यात येणार नाही. 
बोल्ड विनोदी असलेल्या 'लुका छिपी' सिनेमाची गोष्ट ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली. सिनेमात कार्तिक-कृति लिव-इन मध्ये राहत असतात. नंतर त्यांच्या घरातल्यांचा त्यांनी पळुन लग्न केले असल्याचा गैरसमज होतो. त्यानंतर हे दोघे कुटुंबात एका जोडप्याप्रमाणे राहतात. सिनेमाची निर्मिती दिनेश विज़ान यांनी केली आहे. १ मार्च रोजी 'लुका छिपी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.