पूजा सावंत आणि पुष्कर जोगची मैत्री ठरतेय चर्चेचा विषय; काय आहे नेमकं प्रकरण?
![पूजा सावंत आणि पुष्कर जोगची मैत्री ठरतेय चर्चेचा विषय; काय आहे नेमकं प्रकरण? पूजा सावंत आणि पुष्कर जोगची मैत्री ठरतेय चर्चेचा विषय; काय आहे नेमकं प्रकरण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2023/11/23/670524-pushkar-ssssss.jpg?itok=Qmqw_C5R)
काही दिवसांपुर्वी पुष्कर जोगचा बापमाणूस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अनुषा दांडेकर मुख्य भूमिकेत झळकली होती.
मुंबई : 'मुसाफिरा'... स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'मुसाफिर'ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात 'मुसाफिरा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी ढोल ताशाच्या गजरात 'मुसाफिरा'च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. 'मुसाफिरा' ही असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान 'मुसाफिरा'ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी मर्यादित नसून हा चित्रपट प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीत पदार्पण करत आहे. 'मुसाफिरा' प्रेक्षकांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की !''
पूजा सावंत तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. 2010 मध्ये 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून त्यांनी मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी अनेक मराठी हिट चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू दाखवली. पूजा 'बूगी वूगी' आणि 'इंडियाज बेस्ट डान्सर' सारख्या शोमध्ये दिसली होती. तर काही दिवसांपुर्वी पुष्कर जोगचा बापमाणूस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अनुषा दांडेकर मुख्य भूमिकेत झळकली होती.