मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा गुरूवारी 53 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर सलमानने आपल्या चाहत्यांनाच मोठं गिफ्ट दिलं आहे. सलमान खानच्या अभिनयाबरोबरच चाहत्यांना त्याच्यातील एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याचं ब्रेसलेट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेच ब्रेसलेट आता सलमान खान बीइंग ह्यूमन ज्वेलरी सीरीज अंतर्गंत विकणार आहे. या संबंधीचा व्हिडिओ त्याने बुधवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 


या व्हिडिओत सलमान खानसोबत त्याचे वडिल सलीम खान देखील दिसत आहेत. त्यांनी देखील आपल्या हातात सलमान खानप्रमाणे ब्रेसलेट घातला आहे. 


या व्हिडिओसोबत कॅप्शन दिली आहे की, माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्याकडून आता तुम्हा सगळ्यांकरता. माझं ओरिजनल ब्रेसलेट आता सगळ्यांकरता. असली बना आणि असली राहा. 


आता हे ब्रेसलेट फ्लिपकार्ट आणि निवडक बीइंग ह्युमन क्लोथिंग स्टोर्समध्ये ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. 



हे ब्रेसलेट फ्लिपकार्टवर 699 रुपयांत उपलब्ध आहे. सलमान खानच्या पर्सनॅलिटीतील अविभाज्य घटक म्हणजे हे ब्रेसलेट. सलमान प्रत्येकवेळी या ब्रेसलेटला घालून असतो. मग तो सिनेमा असो, पब्लिक प्रोग्राम किंवा टीव्ही शो.


सलमानच्या वडिलांनी हे त्याला गिफ्ट दिलेलं आहे. सलमान हे ब्रेसलेट आपल्यासाठी अतिशय लकी असल्याचं समजतो. या ब्रेसलेटमध्ये फिरोजा दगड लावलेला असून त्याचा रंग आकाशी आहे.