किरण खेर यांनी मुलांसोबत असं काय केलं? की तो कार्यक्रमातून अर्ध्यावरच निघाला...
`मी माझ्या आईला खूप त्रास दिला आहे.`
मुंबई : अभिनेत्री किरण खेर यांच्यासाठी 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोचा आगामी भाग खूप खास असणार आहे. कारण या शोमध्ये खास पाहुणा येणार आहे.
ज्याचं किरण खेर यांच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. शोच्या टीमने आगामी एपिसोडचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये किरण खेर त्यांचा मुलगा सिकंदरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
पण यादरम्यान बोलता- बोलता अभिनेत्री असं काहीतरी बोलून जाते की, शोमध्ये आलेला त्यांचा मुलगा तेथून निघून जेण्याचा निर्णय घेतो.
तेवढ्याच अभिनेत्री त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते. पण हा सगळा प्रकार विनोदाचा एक भाग असणार आहे. त्याचं कारण असं की हा रिअॅलिटी शो आणखीन मजेदार बनवण्यासाठी आई-मुलाची ही जोडी धम्माल करताना दिसणार आहे.
खरंतर, किरण या सिकंदरबद्दल सगळ्यांना सांगत असताना त्या लग्नाचा विषय काढतात, ज्यामुळे अभिनेता तेथून उठून निघून जातो. पण तेवढ्यात किरण खेर मुलाचा हात पकडतात आणि त्याला थांबवतात.
किरण खेर म्हणतात, "आज मला खूपच आनंद होत आहे. कारण सिकंदर माझ्यासोबत बसला आहे. तो चांगलं काम करतोय याचा मला आनंद आहे.पण, आता मला फक्त एकाच गोष्टीची कमतरता जाणवतेय, ती म्हणजे सूनेची"
आईचे हे वाक्य ऐकताच सिकंदर म्हणतो, 'मी जातो, नंतर भेटू...'. सिकंदरचं हे बोलणं ऐकून किरण खेर त्याचा हात धरतात.
त्यानंतर बादशाह सिंकदरला विचारतो," तु पाहिलं पण अशील आणि तुझ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पण असेल की जेव्हा मी इथे किरण खेर यांच्यासोबत बसतो तेव्हा मला त्यांच्याकडून खूप ओरडा पडतो. त्यामुळे मला आज जाणून घ्यायचं आहे की, तूला पण घरी ओरडा पडतो का?"यावर सिंकदर म्हणतो, "मी माझ्या आईला खूप त्रास दिला आहे."