मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या पोस्टमध्ये आपल्या कुटुंबातील महिलांचा फोटो शेअर केला आहे. त्याचप्रमाणे बिग बी यांनी नारी शक्ती आणि स्वच्छ भारत अभियानशी संबंधीत व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 


मात्र बिग बींच्या फोटोतील कमतरता चाहत्यांच्या लगेच लक्षात आली. पोस्टमध्ये आपली नात आराध्य, मुलीची मुलगी नव्या नवेली नंदा, पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चनसोबतच्या फोटोची पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमध्ये ऐश्वर्या कुठेच दिसत नाही. 






8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या जवळच्या महिलांचे फोटो शेअर करतात. तसेच अमिताभ यांनी देखील फोटो शेअर केला आहे.